– शनिवार १३ जानेवारी २०२४ ला अनसुया सेलिब्रेशन हॉल नालवाडी, नागपूर रोड, नालवाडी वर्धा येथे संपन्न होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : वर्धा येथे श्री. संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धा द्वारा आयोजित पाचवा तेली समाज सर्वशाखीय राज्य स्तरीय उपवधू-वर पालक परीचय मेळावा शनिवार १३ जानेवारी २०२४ ला सकाळी ११.०० वा अनसुया सेलिब्रेशन हॉल नालवाडी, नागपूर रोड, नालवाडी वर्धा येथे संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तथा खासदार रामदास तडस, कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, विशेष अतिथी म्हणनू विधान परिषद आमदार अभिजीत वंजारी, विधान परिषद आमदार रामदास आंबटकर, अप्पर पोलीस आयुक्त, नागपूर संजय पाटील प्रमुख अतिथी म्हणुन माजी खासदार सुरेश वाघमारे, शल्य चिकीत्सक डॉ. सचिन तडस, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, प्रदेश सचिव रा.काँ. तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, मुध्याधिकारी राजेश भगत, माजी आमदार राजु तिमांडे, देवळी विधानसभा प्रमुख राजेश बकाने, शिवसेना संपर्क प्रमुख रवि बालपांडे, उद्योजक संघाचे अध्यक्ष प्रविण हिवरे उपस्थित राहणार आहे.
पाचव्या तेली समाज सर्व शाखेतील उपवधु-वर व पालक परिचय मेळावा व स्नेहीबंध परिचयपत्र पुस्तीकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते व समाज बांधवाच्या उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमास उपवधु-वर, पालक तसेच मोठया संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहणाचे आवाहन श्री संताजी जगनाडे महाराज फाऊंडेशन, वर्धाचे वतीने अध्यक्ष सुधीर चाफले, सचिव विजय घवघवे, कोषाध्यक्ष किशोर गुजरकर, कार्याध्यक्ष अतुल पिसे, उपाध्यक्ष निळकंठ पिसे, उपाध्यक्ष मोहन गुल्हाणे, सहसचिव चंद्रकांत चामटकर, सहसचिव योगेश साहु, संघटक प्रविण वास्कर, संचालक चेतन खोंड, संचालिका चित्रा चाफले, संचालिका वैशाली गुजरकर यांनी केले.
