विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार याचा रेसिंग करताना भीषण अपघात झाला आहे. दुबईत होणाऱ्या २४ तासांच्या (२४H दुबई २०२५) या शर्यतीत त्याने सहभाग घेतला होता. या दरम्यान रेसिंग सर्किटमध्ये सराव करताना त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्याच्या रेसिंग कारचा चक्काचूर झाला आहे.
अजित कुमार २४H दुबई २०२५ कार रेसिंगमध्ये भाग घेण्यासाठी तयारी करत होते. सरावादरम्यान कार १८० च्या स्पीडवर होती. यावेळी त्याचे कारवरचे नियंत्रण सुटले आणि कार बॅरिकेला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये कारचा चूरा झाला आहे. दरम्यान या भीषण अपघातात अजित थोडक्यात बचावले असल्याचे त्यांच्या टीमने सांगितले आहे.
माहितीनुसार, दुबईत होणारी २४H दुबई २०२५ कार रेसिंग शर्यत ११ ते १२ जानेवारी दरम्यान होणार आहे. या रेसिंगसाठी अभिनेता अजित कुमार आणि त्यांची स्वतःची रेसिंग टीम सध्या दुबईत आहे. या शर्यतीसाठी अभिनेता आणि त्यांचे सहकारी मैथ्यू डेट्री, फैबियन डफीक्स आणि कैमरन मैकलियोड यांच्यासोबत सराव करत आहे.
अजितने सप्टेंबर २०२४ मध्ये त्याची स्वतः ची रेसिंग टीम लॉन्च केली. याआधी त्यांनी फॉर्म्युला BMW एशिया, ब्रिटिश फॉर्म्युला ३ आणि FIA F२ चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला आहे. अजितला कार रेसिंगसोबतच बाईक रेसिंगचीही आवड आहे. ९० च्या दशकात नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिपने त्यांनी रेसिंगला सुरुवात केली होती.
