विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवा पदभरती जाहिरात १२ ऑक्टोबर २०२५ शुध्दीपत्रक ७ डिसेंबर २०२५ नुसार विभागाच्या संकेतस्थळावर अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरतीसाठीची वेब लिंक देण्यात आली आहे.
परंतु सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ तांत्रिक कारणाने २६ डिसेंबर २०२५ पासुन निष्क्रीय झाल्याने इच्छुक उमेदवार वेबलिंकपर्यंत पोहचू शकत नाहीत.
तरी उमेदवारांनी अर्ज भरण्याकरीता खालील Web Link व QR code चा वापर करुन ऑनलाईन अर्ज भरावे. ९ जानेवारी २०२६ रात्री २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणेसाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html
