Latest Posts

सहा विविध वाहन चोरीच्या गुन्हयांत पाहिजे असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद

– पोस्टे. देसाईगंज, पोस्टे. आरमोरी व पोस्टे. ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर येथे दाखल विविध गुन्हयातील एकूण ३ लाख ०५ हजार रुपये किंमतीच्या ०६ दुचाकीचा पोलीसांनी लावला शोध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्हयात अवैधरित्या वाहन चोरीचे प्रकार वाढले असल्याने त्याबाबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी वेळोवेळी कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने पोस्टे देसाईगंज येथे ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये अप.क्र. ५३/२०२५ नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास चालु असताना ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी पो.स्टे. देसाईगंज येथील सपोनि. आगरकर यांना त्यांच्या गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, संशयित इसम समीर राजरतन चहांदे (३६) रा. रुही पो. निलज ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर हा आमगाव, देसाईगंज येथे त्याच्या ताब्यातील दुचाकी वाहन विकण्याच्या तयारीत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंजचे पो.नि. अजय जगताप यांना याबाबत कळवून त्यांच्या सूचनेनुसार सपोनि आगरकर हे आपल्या पोलीस पथकासह सदर संशयित इसमाचा शोध घेण्याकरीता रवाना झाले.

सदर ठिकाणी पोहचताच संशयित इसमाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याच्या जवळ असलेले हीरो कंपनीचे एच.एफ. डिलक्स वाहन क्र. एम. ३३ वाय. ३७२० हे चोरीचे असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीस ताब्यात घेऊन ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक करण्यात आली. अटकेनंतर आरोपीकडे अधिक सखोल चौकशी केली असता, पोस्टे देसाईगंज येथे दाखल १) अप.क्र. ५३/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या.सं., २) अप.क्र. ५२०/२०२३ कलम ३७९ भा.द.वी., ३) अप.क्र. १७३/२०२३ कलम ३७९ भा.द.वी., तसेच पोस्टे आरमोरी येथे दाखल ४) अप.क्र. ०२३/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं., आणि पोस्टे ब्रम्हपुरी. जि. चंद्रपुर येथे दाखल ५) अप.क्र.१६/२०२५ कलम ३०३(३) भा.न्या.सं. व ६) अप.क्र. ५२/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अशा विविध पोस्टे येथील अभिलेखावर दाखल एकुण ०६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच या व्यतिरिक्त सदर आरोपीने पाथरगोटा जि. गडचिरोली गावाच्या हद्दीतून एक दुचाकी बजाज कंपनीची डिस्कव्हर १५० सि.सी. वाहन क्रमांक एम.एच. ३३ जे. २४५८ चोरी केल्याचे उघड झाले आहे.

पोस्टे देसाईगंज पोलीसांनी आपल्या तपास कौशल्यांचा वापर करुन आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशी दरम्यान एकुण सहा गुन्हयातील सहा दुचाकी वाहन किंमत अंदाजे ३ लाख ०५ हजार रुपये व अन्य एक दुचाकी वाहन किंमत अंदाजे ७५ हजार रुपये अशा किंमतींचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केलेला आहे. अधिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, सदर गुन्हयातील अटक आरोपीवर पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथे चोरी, बलात्कार इ. विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोस्टे देसाईगंज येथील सपोनि आगरकर हे करीत आहेत.

सदर तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज येथील पो.नि. अजय जगताप यांच्या नेतृत्वात सपोनि. संदीप आगरकर, पोशि/दिनेश सोनकुसरे, सतिश बैलमारे, विलास बालमवार, नितेश कडव यांनी पार पाडली.

Latest Posts

Don't Miss