Latest Posts

सिरोंचा येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

– माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते उदघाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : तालुका मुख्यालयातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थे मार्फत चालविल्या जाणाऱ्या धान खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सतीश गांजिवर, कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती रिकुला कृष्णमूर्ति, संचालक रवी राल्लाबंडीवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष एम.डी. शानु, संचालक बानय्या मंचार्ला, सत्यम चीलकामारी, मादेशी मदनय्या, रवी सुलतान, देवा येंगांदुला, सिदिक आदी उपस्थित होते.

याप्रसंगी भाग्यश्री आत्राम यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने यावर्षी खरीप हंगामातील धान खरेदी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपले धान केंद्रावर विक्रीस आणून शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

Latest Posts

Don't Miss