विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेवा सुशासन व गरीब कल्याणकारी योजनांची माहिती भाजप महिला आघाडीने जनतेपर्यंत पोहोचावी तसेच प्रत्येक बुथ सक्षम करावे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका योगिता पिपरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली- चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्राची बैठक भाजपा जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका योगीता पिपरे, जिल्हाध्यक्ष गीता हिंगे यांच्या नेतृत्वात व भाजपा जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, महिला आघाडी जिल्हा महामंत्री प्रिति शंभरकर, गडचिरोली शहर अध्यक्ष कविता उरकुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कोरची तालुक्यात नसरू भामानी यांचे निवासस्थानी बैठक संपन्न झाली यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकिसाठी महाविजय २०२४ ही मोहीम हाती घेऊन भाजपा महिला आघाडीच्या वतीने पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ९ वर्षाच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यात यावी. तसेच महिला आघाडीने प्रत्येक बुथ सक्षम करावे. यावर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला आघाडी कोरची तालुका अध्यक्ष गिरजा कोरेटी यांनी भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला. भाजपा जिल्हा महामंत्री तथा लोकसभा संयोजिका योगीता पिपरे यांनी भाजपचा दुपट्टा देवुन त्यांचे स्वागत केले.
बैठकीला महिला आघाडी कोरची तालुका अध्यक्ष शिला सोनकत्री, कोरची न.प. माजी नगराध्यक्ष ज्योति नैताम, मालता हिडामी, शांता मडावी, दुर्गा मडावी, प्रतिभा मडावी, कौशल्या काटेंगे, आणिता नरोटी, निलकमल मोहूर्ले, मंजुषा कुमरे, सगुणा काटेंगे, जया सहारे, जया बागडे तसेच भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
