विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारच्यावतीने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन एल्डरलाईन १४ हजार ५६७ सर्व राज्यांत व केंद्र शासित प्रदेशात सुरु करण्यात आली आहे.
सध्या देशामध्ये सुमारे १५ कोटी लोकसंख्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे, ही देशातील एकूण लोकसंख्ये पैकी ९ टक्के पेक्षा जास्त आहे. विविध संशोधन, कागदपत्रांनुसार, ही संख्या २०५० पर्यंत साधारण ३५ कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. भारतातील ज्येष्ठ नागरिकांची सहानुभूती पूर्वक सेवा करून सुखी आणि निरोगी जीवन वृद्धींगत करण्यासाठी, विविध सरकारी विभाग, सामाजिक संस्था, स्वयंसेवक, अशा अनेक वचनबद्ध भागीदारांच्या सहभागातून आवश्यक ती माहिती आणि सहकार्य करण्यासाठी जेष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्री हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहेत.
सदर हेल्पलाईन राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये चालविण्यात येत आहे. राज्यात एन्टर लाईन १४ हजार ५६७ ही सेवा सन ऑगस्ट २०२१ पासुन राबविण्यात येत आहे. या मध्ये कनेक्ट सेंटर व फिल्ड टीम, विविध शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, विविध ज्येष्ठ नागरिक संघटना, विविध स्वयंसेवी संस्था, कायदेविषयक सल्लागार, समुपदेशक, स्वयंसेवक आदींच्या सहभागातून व मदतीने कार्यरत आहे.
एल्डर लाईनसाठी १४ हजार ५६७ टोल फ्री क्रमांक असून सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत वर्षातील २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर हे दिवस वगळता अविरत सुरु राहते.
एल्डर लाईन द्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा : आरोग्यविषयक जागरूकता, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण, सांस्कृतिक, कला, ज्येष्ठां संबंधी अनुकूल उत्पादने, आणि मनोरंजनाशी संबंधित माहिती. कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी इ.), आर्थिक, पेन्शन संबंधित सल्ला, आणि सरकारी योजनांची माहिती चिंता निराकरण, नातेसंबंध व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित भीती निवारण, जीवन व्यवस्थापन, (वेळ, ताण, राग व्यवस्थापन) मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण (मृत्युपत्र बनवण्याचे महत्व इ.) विविध सरकारी यंत्रणा, भागधारक, स्वयंसेवक, सामाजिक संस्था यांचे मदतीने बेघर वृद्ध, अत्याचारग्रस्त ज्येष्ठ नागरिक, किंवा हरवलेल्या व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न व त्यांना परिवाराशी पुनर्मिलन करणे साठी कार्य करणे असा आहे.
अधिक माहिती : एल्डर लाईन १४५६७ या हेल्पलाईन आणि तिच्या संपूर्ण भारतातील सेवांबद्दल अधिक माहिती www.elderline.dosje.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
