Latest Posts

अल्पसंख्याकांसाठी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी : जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ अध्यक्ष ललीत गांधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कक्षाव्दारे  राबविण्यात येणाऱ्या सात योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश अल्पसंख्याक जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ अध्यक्ष ललीत गांधी यांनी आज दिलेत.

अल्पसंख्याकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजनांव्दारे विकास करण्याला प्राधान्य देण्याचे गांधी म्हणाले. नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते, उदयोजक पंकज सारडा उपस्थित होते. तत्पुर्वी गांधी यांनी वरठी येथील जैन मंदीराला भेट दिली.

अल्पसंख्याक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्र विकास योजना, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम, मदरसा आधुनिकीककरण योजना, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना, जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समिती अल्पसंख्याक बहुल शाळांना पायाभुत सुविधा पुरवणे तसेच बौध्द व जिओ पारशी योजनाची माहिती अधिनस्त यंत्रणांनी नागरिकांना दयावी.

राज्य स्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्या विदयार्थ्याना यावेळी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातुन प्रत्येकी पाच विदयार्थ्याना पुरस्कृत करण्यात आले. प्रमाणपत्र व रोख बक्षीस देवून त्यांचा गांधी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

भगवान महावीर यांचे विचार विदयार्थ्यांच्या जडणघडणीत महत्वाचे असून त्यासाठी निबंध स्पर्धेसोबत अन्य उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीनंतर गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Latest Posts

Don't Miss