विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्यावतीने राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता राष्ट्रीय वैमानिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे व्यावसायिक वैमानिक परवाना एअरबस ए ३२० टाईप रेटिंगच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत अधिक माहिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य पुणेच्या trti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गितांजली निकम यांनी कळविले आहे.
