Latest Posts

अनुसुचित जमातीच्या मुलां-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या भामरागड व एटापल्ली तालुक्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासन निर्णय, ०२ फेब्रुवारी २०२६ अन्वये राज्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमांसाठी Qs (quaacquarelli Symonds) World Ranking २०० च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या करिता सदर योजनेंतर्गत पात्र उमेदवारांकडून शैक्षणिक सत्र २०२६-२०२७ साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहे.

उमेदवार व उमेदवाराचे आई/वडील अथवा पालक भरताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. शैक्षणिक सत्र २०२६-२०२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अद्यावत ( सन २०२६मधील) Qs (quaacquarelli Symonds) World Ranking २०० आत असणे बंधनकारक आहे.

विहीत निकषानुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास Qs (quaacquarelli Symonds) World Ranking २०० पासून पुढे चढत्या क्रमाने ३०० पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. उमेदवाराच्या पालकांचे /कुटूंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्याचे स्वत:चे उत्पन्न धरुन सर्व मार्गानी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील (सन- २०२५-२०२६ मधील) एकत्रित कौटूं‍बिक वार्षिक उत्पन्न ०८ लाखपेक्षा जास्त नसावे.

विहीत निकषानुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास कुटूंबाची उत्पन्न मर्यादा १० लाखापर्यंत शिथील केली जाईल. या योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्राता, वयोमर्यादा,शैक्षणिक आहर्ता, अनुज्ञेय लाभ, निवड कार्यपध्दती इत्यादी माहिती आदिवासी विभागाच्या https;//fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी https;//fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावा व मुळ प्रमाणपत्रे/कागदपत्र ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करावीत.

ऑनलाईन अर्जा व्यतिरिक्त इतर कोणत्याही पध्दतीने केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. शिष्यवृत्ती अर्जाबाबत अर्जदारांनी सर्व माहिती /सुचना ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या ई-मेलद्वारे देण्यात येईल. असे सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड, एम. बी. मडावी यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss