विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे आणि विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणे करिता शासनाने १३ जुन २०१८ च्या सुधारित शासन निर्णयान्वय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. सन २०२४- २५ या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ घेणेकरिता विद्याध्यांना वसतीगृह व स्वाधार योजनेचे अर्ज करणेकरिता एकच ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रणालीद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर स्वाधार योजनकरिता ग्राह्य धरले जाऊन नियमानुसार पुढील पडताळणीसाठी संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगईनवर अग्रेशित केले जातील.
सदर माहिती पोर्टलवरील लॉगीनमध्ये विद्याथ्यर्यांनी परिपुर्ण भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सदर माहिती अपुर्ण भरल्यास सदर अर्ज अपात्र करण्यात येईल व त्यासाठी सर्वस्वी विद्यार्थी जबाबदार राहील याबाबत नोंद घेण्यात यावी. सदर योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम ३१ डिसेंबर २०२४ अर्ज करण्याकरिता ऑनलाईन पोर्टल- ttps://hmas.mahait.org टीप- सदर योजनेच्या ठळक निकषामध्ये विद्याथी पात्र ठरत नसल्यास अशा विद्यार्थ्यांचे अर्ज थेट अपात्र ठरविण्यात येईल.
