Latest Posts

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत विविध व्यवसायाकरीता कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे प्रभारी शाखा व्यवस्थापक यांनी केले आहे.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशिक अंतर्गत नागपूर शाखेच्यावतीने कर्ज योजनेकरीता विविध व्यवसायाकरीता वर्धा जिल्ह्याकरीता एकुण ६२ लाभार्थीचा लक्षांक प्राप्त झालेला आहे. या कर्ज योजनेत महामंडळाचा ९० ते ९५ टक्के व लाभार्थ्यांचा ५ ते १० टक्के सहभाग असणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज https://loan.mahashabari.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन संपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव  शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा नागपूर, आदिवासी भवन दुसरा मजला गिरीपेठ नागपूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे.

योजनेंतर्गत महिला सशक्तीकरण योजनेंतर्गत २ लक्ष रुपये, लहान उद्योगधंदे करीता २ लक्ष रुपये, हॉटेल व ढाबा व्यवसायाकरीता ५ लक्ष रुपये, स्पेअर पार्ट, गॅरेज, ऑटो वर्क शॉप करीता ५ लक्ष रुपये, कृषि सलग्न  व्यवसायाकरीता २ लक्ष रुचे ऑटो रिक्षा, मालवाहू रिक्षा व्यवसायाकरीता 3 लक्ष रुपये, स्वयंसहायता बचत गटाकरीता ५ लक्ष रुपयाचे कर्ज वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्याला एकुण ६२ लाभार्थी उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

इच्छुक लाभार्थ्यांनी कर्ज व्यवसायाचे प्रस्ताव सादर करतांना जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल, रेशन कार्ड, व्यवसायाचे कोठेशन, आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहना करीता वाहन चालक परवाना, बॅच परवाना, बॅकेचे कर्ज नसल्याचे दाखले, व ग्राम पंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसाय प्रमाणपत्र, दोन जामीनदारांचा आधार, जातीचा दाखला, सातबारा उतारा व दोन छायाचित्र इत्यादी कागदपत्रे सोबत जोडावे. अधिक माहितीसाठी महामंडळाशी संपर्क साधावा, असे  शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss