Latest Posts

ग्रामीण भागातील विज्ञान संस्थांना सु.त्रिं. तासकर पुरस्काराची संधी : १ लाख रुपयांचे पारितोषिक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli ) : महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात विज्ञान शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या संस्थांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिला जाणारा मानाचा सु.त्रिं. तासकर पुरस्कार २०२६ जाहीर झाला असून, यासाठी पात्र संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. १ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

​मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह दिलीप हेर्लेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. ग्रामीण भागात किमान १० वर्षे विज्ञान शिक्षणाचे सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या संस्था या पुरस्कारासाठी पात्र ठरतील. विज्ञानाची ओढ निर्माण करणाऱ्या आणि ग्रामीण स्तरावर बदल घडवून आणणाऱ्या संस्थांच्या कार्याची दखल या माध्यमातून घेतली जाते.

अर्जासाठी आवश्यक अटी व तपशील –

पुरस्कारासाठी इच्छुक संस्थांनी आपला सविस्तर अहवाल सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असावा:
​संस्थेचे स्थापना वर्ष आणि नोंदणी तपशील.
​कामाचे स्वरूप, कार्यक्षेत्र आणि उपक्रमांचा अहवाल.
​कार्यक्रमांची छायाचित्रे, प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे.
​यापूर्वी मिळालेल्या पुरस्कारांची माहिती.

येथे साधा संपर्क –
​इच्छुक संस्थांनी आपली सर्व माहिती २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावी:
पत्ता: मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई – ४०००२२.

​अधिक माहितीसाठी संस्थांनी (०२२) ४८२६ ३७५० किंवा ९९६९१००९६१ (मंगळवार वगळून, सकाळी ११ ते ५) या क्रमांकावर संपर्क साधावा, अथवा www.mavipa.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss