Latest Posts

आरटीई २५% मोफत प्रवेश अंतर्गत मोफत प्रवेशाकरीता पालकांनी ऑनलाईन अर्ज करा : शिक्षणाधिकारी (प्राथ.) बाबासाहेब पवार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलमा १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, बिना अनुदानित शाळा, पोलीस कल्यानकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालीका शाळा (स्वंय अर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया ऑनलईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.

आरटीई २५% मोफत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी झालेली आहे. या फरीता-डेपठारा पाल्यांच्या मोफत प्रवेशाकरीता पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया १४ जानेवारी २०२५ ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीपर्यंत सूविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी https://student.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. प्रवेशाकरीता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतीम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जानार नाहीत.

करीता आरटीई मोफत प्रवेश योजनेअंतर्गत आपल्या पाल्याच्या मोफत प्रवेशाकरीता पालकांनी दिलेल्या विहीत मुदतीत ऑनलाईन अर्ज करुन मोफत प्रवेश योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाबासाहेब पवार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss