Latest Posts

दरोडा व मोटार सायकल चोरांचे आवळल्या मुसक्या : राजुरा पोलिसांची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : पोलीस ठाणे राजुरा हद्दीत १६ मार्च २०२५ चे रात्रौ दरम्यान सास्ती कॉलरी आर.सी. ऑफीस येथे अज्ञात दरोडेखोरांनी वेकीली चे १ लाख रुपये किंमतीचे केबल चोरुन नेल्याची तक्रार फिर्यादी सिध्दार्थ हर्षवर्धन तोडे यांनी दिल्यावरुन अपराध क्रमांक १२८/२०२५ कलम ३१२ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

राजुरा पोलीसांनी सदर दरोडा गुन्हयाचा सखोल तपास करुन सदर दरोडयातील आरोपी करण इंदुल निषाद, दिपक उर्फ एटीएम अजय राजपुत, लॉरेन्स उर्फ ईशु जार्ज दास,  सिराज संग्राम बहुरीया व दोन विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन सदर दरोडा गुन्हयासह गडचिरोली व वर्धा जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणले आहे.

सदर आरोपीकडुन चोरलेले १ लाख रुपये किमतीचे केबल सह इतर ठिकाणाहुन चोरलेले दुचाकी वाहन पल्सर NS 125 MH34-CG-0037 किंमत ८० हजार रुपये, पल्सर NS 200 MH12-QL-6391 किंमत ५० हजार रुपये, सुझुकी एक्सेस मोपेड क्र. MH32-AW-8378 किंमत ६० हजार रुपये असे एकुण २ लाख ९० हजार रुपयांचे मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सदर कारवाई परि.सहा. पोलीस अधीक्षक तथा ठाणे प्रभारी अधिकारी अनिकेत हिरडे (भा.पो.से.) यांचे कुशल नेतृत्वात सपोनि रमेश नन्नावरे, पोउपनि सोरते, पांडुरंग हाके, सफौ किशोर तुमराम, पोहवा अनुप डांगे, सचिन पडवे, कैलास आलाम, पोअं. महेश बोलगोडवार, योगेश पिदुरकर, शरद राठोड, शफीक शेख, अविनाश बांबोडे यांनी केले.

Latest Posts

Don't Miss