विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur): वंचित बहुजन आघाडी तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय पातळीवर पदक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये त्रिशरण विहार समितीचे अध्यक्ष संदीप मेश्राम तसेच सचिव हेमराज फुलझेले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नीता बटघरे प्रमुख मार्गदर्शक तसेच किरण प्रकाश रामटेके व प्रज्ञा नमनकर तालुका संघटिका विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष बल्लारपूर शहराध्यक्ष उमेश कडू होते.
सर्वप्रथम मान्यवर अतिथींनी महापुरुषांच्या प्रतिमांना द्वीप माल्यार्पन व दिप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांचा जयघोष केला. कार्यक्रमाचा सुरुवातीला स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय भाषण उमेश कडू यांनी केले. ते म्हणाले की समाजापुढील भावी समस्यांचे व रूप बदलून आलेल्या शिक्षणासंदर्भात सवर्णांच्या प्रतिकाराची नव्या रूपात संदर्भात जाणीव करून दिले व या परिस्थितीत सुद्धा बहुजन समाजाला शिक्षण ग्रहण करण्यासाठी जो संघर्ष करावा लागणार आहे त्याकरीता प्रत्येकाने तत्पर राहण्याचे आव्हान केले.
या प्रसंगी खेळाडू विद्यार्थ्यांचा व त्यांच्या प्रशिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. राष्ट्रीय पारंपरिक लाठी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावणारे आयुष मून तसेच रजत पदक पटकावणारे विद्यार्थी अनिकेत रामटेके, वीरांगणा दुबे ,नुकुर पिंपळे, पंखुडी गावंडे, अनामिका करमरकर, एरान जोग, हर्षदीप नरांजने, अरिहंद शेंडे तसेच प्रशिक्षक प्रशांत पिंपळे अहमद, मनोज डे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कुंजबिहारी बटघरे , देवराम नंदेश्वर , प्रकाश रामटेके, सुधाकर गेडाम , प्रकाश तावाडे ,दुरेश तेलंग यांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक महिला शहर अध्यक्ष रेखा पागडे, संचालन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष अभिलाषा चुनारकर तर आभार प्रदर्शन शहर महासचिव गौतम रामटेके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालू चांदेकर, वनमला भसारकर, स्वीटी लोंढे, समता लभाणे, रजनी गायकवाड, मंगला झाडे, किरण मेश्राम, सविता नाईक व कार्यकर्ते स्वराज करमरकर, गोविंदा गोरघाटे, गाणार साहेब यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
