विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. E-KYC करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता शेवटच्या तारखेपर्यंत E-KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
पूर्वी रेशन कार्डधारकांसाठी ३१ डिसेंबर २०२४ ही शेवटची तारीख होती. पण आता, शासनाकडून E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवली आहे, आणि हे आता मार्च २०२५ पर्यंत लागू आहे.
ही मुदत वाढवून दिली असली तरी, त्यानंतर कोणतीही मुदत वाढवली जाणार नाही. त्यामुळे, जर तुम्ही अद्याप E-KYC पूर्ण केली नसेल, तर तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करा. अन्यथा, तुम्हाला राशन पुरवठा थांबवला जाऊ शकतो, किंवा तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकते.
E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत मार्च २०२५ पर्यंत वाढवली गेली आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रातील रेशन कार्डधारक असाल, तर ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे. यासाठी, लवकरात लवकर E-KYC पूर्ण करा आणि राशन कार्ड सुरक्षित करा.
