विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : पुष्पा २ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. २ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झालेला पुष्पा २ बघायला प्रेक्षकांची हाउसफुल्ल गर्दी झाली. पुष्पा २ ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. भारतीय मनोरंजन विश्वातील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून पुष्पा २ ला ओळखले जाते. अशातच पुष्पा २ च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुष्पा २ मध्ये आणखी २० मिनिटे अॅड केली जाणार असून नव्या फुटेजसह पुष्पा २ थिएटरमध्ये लवकरच रिलीज होणार आहे.
पुष्पा २ चा Extended Cut थिएटरमध्ये लवकरच –
पुष्पा २ सिनेमा २ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला. तब्बल ३ तास २० मिनिटे लांबीचा हा सिनेमा प्रेक्षकांना चांगलाच आवडला. आता MovieFied Bollywood च्या रिपोर्टनुसार पुष्पा २ मध्ये आणखी २० मिनिटे वाढणार असून तब्बल पावणेचार तास म्हणजेच ३ तास ४० मिनिटे लांबीचा पुष्पा २ प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळणार आहे. येत्या ख्रिसमसच्या मुहुर्तावर २५ डिसेंबरला पुष्पा २ सिनेमा २० मिनिटांच्या नवीन फुटेजसह प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
पुष्पा २ मुळे वरुण धवनच्या बेबी जॉनला मिळणार टक्कर –
पुष्पा २ च्या कमाईचे वादळ अजूनही चांगलंच घोंघावत आहे. अशातच पुष्पा २ Extended cut सह रिलीज झाल्यावर वरुण धवनच्या बेबी जॉनला पुष्पा २ चे तगडे आव्हान असेल. कारण पुष्पा २ चा Extended cut २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. तर वरुण धवनचा बेबी जॉन सिनेमाही २५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे पुष्पा २ आणि वरुण धवनच्या बेबी जॉनमध्ये कोणता सिनेमा बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
