Latest Posts

पुष्पा २ ची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ : ५०० कोटींच्या क्लबमध्ये जलद प्रवेश करणारा ठरला भारतीय चित्रपट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई (Mumbai) : पुष्पा २ : द रुल चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सुरुवातीच्या दिवसापासून आतापर्यंत त्याने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम केले आहेत.

सुमारे ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चार दिवसांत आपल्या बजेटपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. एवढेच नाही तर ५०० कोटींच्या क्लबमध्ये सर्वात जलद प्रवेश करणारा हा भारतीय चित्रपट ठरला आहे.

यानंतर आता पुष्पा २ : द रुलाने रिलीजच्या ११ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी देखील मोठे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ७२५ कोटी ८ लाखांची कोटींची कमाई केली आहे. ९ व्या दिवशी चित्रपटाने ३६ कोटी ४ लाखांची कमाई केली, तर १० व्या दिवशी पुष्पा २ : द रुल चे कलेक्शन ६३.३ कोटी रुपये होते.

पुष्पा 2 : द रुल ने रिलीजच्या ११ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, पुष्पा २ : द रुलचे ११ दिवसांचे एकूण कलेक्शन आता ९०० कोटींवर पोहोचले आहे. यामध्ये चित्रपटाने रिलीजच्या ११ दिवसांत तेलगूमध्ये २७९.३५ कोटी रुपये, हिंदीमध्ये ५५३.१ कोटी रुपये, तामिळमध्ये ४८.१ कोटी रुपये, कन्नडमध्ये ६.५५ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये १३.४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

KGF चेंटर २ च्या कलेक्शनचा विक्रम मोडला –
या चित्रपटाने रिलीजच्या ११ दिवसांत विक्रमी ९००.५ कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने यशच्या ब्लॉकबस्टर चित्रपट KGF चेंटर २ च्या कलेक्शनचा विक्रम मोडीत काढला आहे. भारतात KGF २ चे लाइफटाईम कलेक्शन ८५९.७ कोटी रुपये होते. त्यामुळे पुष्पा २ : द स्त हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

Latest Posts

Don't Miss