विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : नायलॉन मांजामुळे माणसं, पशू, पक्षी यांच्या जीवाला धोका असल्याने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असतानाही जिल्ह्यात काही लोक छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री करत आहे. या माहितीच्या आधाराने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुल शहरात छापा टाकून ३९ हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करीत विक्रेत्या आरोपी अंकुश नंदकिशोर बोडखे (३१) याला अटक केले.
स्थानिक गुन्हे शाखेमधील अधिकारी व अंमलदार मुल शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, बाजार चौक मुल परीसरात अंकुश बोडखे हा पंतग उडविण्यासाठी नॉयलॉन मांजाची लपुन विक्री करीत आहे, अशा माहितीवरून प्रसाद कॉम्पलेक्स, बाजार चौक, मुल येथे धाड टाकली असता त्याचे मालकीचे गोडाउन मध्ये विविध रंगाच्या प्लास्टिक चक्रीवर गुडांळलेला प्रतिबंधित नॉयलॉन मांजा धागा असलेल्या चक्र्या एकुण ४३ नग, असा एकुण ३९ हजार १०० रू. माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी अंकुश नंदकिशोर बोडखे (३१) रा. वॉर्ड १४. स्टेट बँकचे मागे. सुल, ता. मुल, जि. चंद्रपूरयाने मालकीचे गोडाउनमध्ये पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणारा प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा अवैधरित्या विक्री करीता साठवुन ठेवला तसेच नमुद प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा हा मानवी जिवितास तसेच पर्यावरण, पक्षी यांना घातक व भोकादायक असल्याचे माहिती असुन सुध्दा जाणिवपुर्वक स्वतःचे आर्थिक फायदयासाठी विकीकरीता ताब्यात बाळगले आहे. या करीता त्याच्या विरुध्द पोलीस स्टेशन मुल येथे भारतीय न्याय सहिता २०२३ कलम २२३, २९२.२९३ सहकलम ५,१५पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे मुल करीत आहे.
सदरची कारवाई सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतुत्वात बलराम झाडोकार सहायक पोलीस निरीक्षक, संतोष निंभोरकर पोलीस उप निरीक्षक, पोहवा नितिन साळवे, पोहवा सुभाष गोहोकार, अंमलदार मिलिंद जांभुळे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.
