Latest Posts

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : केंद्रीय अर्थसंकल्पात पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास योजनेंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची घोषणा केलेली आहे. ही योजना पुढील पाच वर्षाकरिता ६३ हजार कोटी इतक्या अंदाजित खर्चासह देशातील महत्वाच्या ५०० कंपन्यामध्ये तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे, आवाहन करण्यात आले आहे.

सदर योजना भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत राबविण्यात येणार असून पुढील पाच वर्षात एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी देशातील सर्वोच्च ५०० कंपन्यामध्ये युवकांना इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या कंपन्या कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत कॉर्पोरेट सोशल रीस्पोन्सीबिलीटी (CSR) उपक्रमामध्ये सहभागी असणे आवश्यक आहे. प्रत्येक इंटर्नसाठी वार्षिक ६६ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. दरमहा ५ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. यामध्ये सदर कंपनी त्यांच्या CSR निधीमधून ५०० रुपये उमेदवारास देईल आणि केंद्र शासनाकडून ४ हजार ५०० रुपये मानधन उमेदवारास देण्यात येणार आहे. हे मानधन DBT द्वारे उमेदवाराच्या खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येईल. भारत सरकार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत उमेदवारास विमा कवच उपलब्ध करून दिल्या जाणारआहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्णवेळ शिक्षण घेत असलेले किंवा नोकरी करत असलेले उमेदवार पात्र असणार नाही. उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ रुपयापेक्षा जास्त नसावे किंवा कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरीत नसावे. उमेदवाराचे वय २१ ते २४ वर्ष असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवार https://pmintership.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करू शकतात. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत वर्धा जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss