Latest Posts

पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) करीता अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) कार्यान्वित करण्यांत आली. तरूणांना रोजगारक्षम बनवणे हा योजनेचा मुख्य उददेश आहे.

१. या योजनेची पात्रता निकष शिक्षण किंवा रोजगारात नसलेले बेरोजगार तरूण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू. ८ लाखांपेक्षा जास्त नसावे किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. उमेदवारांचे वय २१ ते २४ असावे.

२. ऑनलाईन पोर्टल आणि व्यवस्थापन कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) योजनेच्या व्यवस्थापनासाठी https://pminternship.mca.gov.in/ हे विशेष ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टल‌द्वारे कंपन्या आणि तरुणांना नोंदणी करण्याची व एकमेकांशी जोडले जाण्याची संधी मिळेल. तसेच, सरकार द्वारे थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणाली‌द्वारे आर्थिक सहाय्य वितरित केले जाईल.

३. अर्ज करण्याची अंतिम तारीख, उमेदवार ३१ मार्च २०२५ पर्यंत या संधीसाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर पोर्टल उमेदवारांच्या प्रोफाइलनुसार संधी जुळवेल आणि कंपन्यांना निवडलेल्या अर्जाचीमाहिती पाठवेल. उमेदवारांना विविध उ‌द्योगांमध्ये अनुभव घेण्याची संधी मिळेल.

४. यूट्यूब मार्गदर्शन व्हिडिओज प्रोफाइल पूर्ण करण्यासाठी :
English : https://youtu.be/Xd47t5qGiUE?si=gQoCvWGbrgDpw302
Hindi : https://youtu.be/3bAsDCgcpCY?si=QnxFM62nvRqtTdRI

५. इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी :
English : https://youtu.be/TSO9DXtnTAs?si=UKrYKR&D ZT9INKP
Hindi : https://youtu.be/apeg14TM0Pk?si=n qjRoHubeS911kD

संपर्क अधिकारी (महाराष्ट्र आणि गोवा), संतोषकुमार प्रादेशिक संचालक (Western Region). MCA-९९५८७७५८८९, नोडल अधिकारी (महाराष्ट्र आणि गोवा) अपर्णा मुडियम, ICLS, उपसंचालक, MCA (Western Region) ९०१३२७६३६६

२. ऋजुता बनकर, ICLS, सहाय्यक संचालक, MCA (Western Region) ९६६५३१४१४५
सोशल मीडिया हॅडल्स, फेसबुक : facebook.com/MCA2 India
ट्विटर : twitter.com/MCA21India
इस्टाग्राम : instagram.com/mca2lindia
यूट्यूब : www.youtube.com@MCA21India

ही योजना बेरोजगार तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी मोठी संधी आहे इच्छुक उमेदवारांनी ३१ मार्च २०२५ च्या आत अर्ज करावा. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशलय विकास रोजगार, व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.- २ युनिट क्रमांक-२ कॉम्प्लेक्स, पोलीस मुख्यालया समोर, गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क करावा. असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss