विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : पोलीस सराव करणाऱ्या दोन जणांचा चंद्रपूर तालुक्यातील धानोरा-भोयेगाव मार्गावरील वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला. यात एक तरुणी, एक तरुणांचा समावेश आहे. संध्या शिंदे रा. जिवती, युगल नागापुरे रा. सोनापूर देशपांडे असे मृतकाचे नाव असून समिक्षा शेंडे हिला वाचविण्यात यश आले.
चंद्रपूर येथील आदर्श फिजिकल ग्रुप चे संचालक आदर्श चिवंडे हे आपल्या विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी धानोरा-भोयेगाव मार्गावरील वर्धा नदीवर आणले होते. व्यायाम झाल्यानंतर काही मुल-मुली पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन मुली बुडाले. एका तरुणाने मुलीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तोही बुडाला. तर विद्यार्थ्यांच्या मदतीने एका मुलीला वाचविण्यात यश आले. तर एका मुलीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. बातमी लिहिस्तर दुसऱ्या मृतदेह चे शोध मोहीम सुरू आहे.
घटननेची माहिती पोलीसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
