Latest Posts

मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ३१ जानेवारीपुर्वी नोंदणी करावी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara): इतर मागास बहुजन कल्याण विभागाव्दारे केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विदयार्थ्यांना प्रदान करण्यात येते.

या योजने अंतर्गत मॅट्रिकपूर्व इयत्ता ९ वी व १० वी तसेच  मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज केंन्द्र शासनाच्या https://scholarships.gov.in (NSP Portal) या संकेतस्थळावर नोंदनी करावे लागतात. यावर्षी नोंदणी करण्याची अंतिम ३१ जानेवारी २०२६  आहे. तरी संबंधीत शाळा महाविदयालय यांचे मार्फत Institute Level verification साठी शेवटची तारीख ही १५ फेबुवारी २०२६ अशी असल्याचे विभागाने कळवले आहे. याची जिल्यातील सर्व पात्र विदयार्थी व संबंधीत प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी नोंद घ्यावी. व नोंदणी वेळेत करून घ्यावी.

या संबंधाने काही अडचणी असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन सचिन मडावी, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, भंडारा यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss