Latest Posts

गरीब आणि निराधारांच्या चेहऱ्यावरील हास्याने मिळते समाधान : मीट द प्रेस मध्ये जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. ची माहीती

– पुढील दोन आठवड्यात निघेल रस्त्यांचे दुरूस्तीचे वर्क आर्डर चंद्रपूर 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrpur) : शहरात महापालिकेच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. या कामात, रस्ते पुन्हा खोदुन पाईपलाईन टाकल्या जात आहेत. खोदलेल्या रस्तावर डांबर आणि काळी गिट्टी बारीक चुरी वापरून रस्ते बुजवले जात आहेत. परंतु बारीक चुरीमुटे दुचाकी वाहने घसरून लहान – मोठे अपघात होत आहेत. याकडे गंभीरतेने लक्ष्य देऊन दोन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. पुढील दोन आठवड्यात रस्त्याचे दुरुस्तीचे कामाचे कार्यादेश जारी केला जाईल. यासोबतच गरीब आणि निराधार लोकांना मदत केल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील वरील हास्य बघुन समाधान मिळते अशी माहीती श्रमिक पत्रकार संघात आयोजित मीट द प्रेस मध्ये जिलाधिकारी विनय गौडा जी.सी. ने दीली.

यावेळी मंचावर चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर, सचिव प्रविण बतकी उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

त्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांनी शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्याबद्दलची  माहिती दिली. मीडिया लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक आहे. सरकार, प्रशासन आणि जनता यांच्यातील माध्यमे हा एक महत्त्वाचा दुवा आहे. ते जनतेचा आवाज प्रशासन आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याची भूमिका बजावतात. लोकशाही टिकवण्यासाठी माध्यमे मजबूत असणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वनसंपदाबद्दल माहिती दिली. जिल्ह्यात सीटीपीएस, स्टील प्लांट, सिमेंट इंडस्ट्री, वेकोली आदि कंपन्या असणाऱ्या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तरुणांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्याच्या अनेक संधी आहेत.

जिल्ह्यात दिवसेंदिवस रेती तस्करीच्या वाढत्या घटनांवर प्रशासन कारवाई करत आहे. घरकुल योजनेत प्रशासनाने जप्त केलेली रेती वापरसाठी पहिले प्राध्यान्य दिल्या जात आहे. रेती घाटांच्या लिलावाबाबत सरकारी धोरणात बदल झाला आहे. राज्य सरकारच्या सूचनां नंतर रेती घाटांचा लिलाव लवकरच सुरू होईल असे सांगण्यात आले. शहरात उपस्थित असलेल्या विविध कंपन्यांकडून पसरविणाऱ्या प्रदुषणावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले. प्रदूषण निर्माण करणारे सीटीपीएस जुन्या युनिट्स बंद करून त्यांच्या जागी नवीन युनिट्स बसवणार आहे.

शहरातील खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्यांना  गांभीर्याने घेत पुढील आठवड्यापर्यत रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे कार्यादेश निघेल असेही सांगीतले. आतापर्यंत प्रशासनाकडू राबविण्यात आलेल्या योजनांपैकी गृहनिर्माण योजनेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कारण या योजनेद्वारे गरिबांना घरांचा लाभ मिळतो. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघून समाधान मिळते. भूमाफियांकडून अनधिकृत भूखंड विक्रीच्या वाढत्या प्रकरणांबाबत तहसीलदार आणि महानगरपालिका आयुक्तांनी कारवाई केली. नोटरी प्रमाणपत्रांसह भूखंड खुलेआम विकले जात आहेत. परंतु नोटरीद्वारे केलेली खरेदी आणि विक्री अधिकृत मानली जात नाही. अशा परिस्थितीत बँकांकडून कर्ज मिळत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे खूप महत्वाचे आहे.

अलिकडेच राज्य सरकारने सर्व कार्यालयीन कामकाज मराठी भाषेत करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नाशिकमध्ये सीईओ म्हणून काम करताना मराठी भाषा शिकण्याबद्दल सांगितले. यावेळी मराठीत बोलतानी काही गमतीशीर अनुभव आल्यांचेही त्यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन बाळु रामटेके यांनी तर आभार प्रविण बतकी यांनी मानले.

कार्यक्रमाला चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य, इलेक्ट्रानिक मिडीया, पोर्टल चे प्रतिनिधि, साप्ताहिक चे प्रतिनिधि उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss