Latest Posts

पोलीस स्टेशन चा हाकेच्या अंतरावरील बचत भवन येथे चोरी : आरोपी गजाआड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : बल्लारपूर पोलीस स्टेशन चा हाकेच्या अंतरावर असलेल्या बचत भवन येथे एका खोलीची खिडकी तोडून चोराने ३८ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केले होते. पोलिसांनी आरोपीचे शोध घेऊन त्याला १४ मार्च ला अटक केले. फिरोज अब्दुल शेख (४०) रा. लालपेठ कॉलरी चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी शेख फरीद शेख शेरीफ यांचे नव निर्माण होत असलेल्या नगर परिषद येथे सहायक ठेकेदार म्हणून काम करत आहेत. ८ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता बांधकाम साहित्य बचत भवन च्या एका खोली मध्ये ठेवून बाहेरून कुलूप लावले होते. दुसऱ्या दिवशी दिं ९ मार्च रोजी बांधकामात लागणारे साहित्य व सामान पाहण्यासाठी बचत भवन येथे गेले असता ज्या खोलीत साहित्य ठेवले होते तेथील खिडकी तुटलेली दिसली. तिथे ठेवलेले ब्रोकर मशीन किंअं.३० हजार रुपये, ब्रोकर मशीन मध्ये लागणारे लोखंडी बिटा ५ किंअं ५ हजार रुपये व एक लोखंडी शिडी किंअं ३ हजार रुपये असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. फिर्यादी ने बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे १३ मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास तक्रार दाखल केले. त्यावरून बल्लारपूर पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकांनी आरोपीचे शोध घेत अटक करून त्याच्या जवळून चोरी गेलेले साहित्य हस्तगत केले.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन दिवटे करीत आहेत.

Latest Posts

Don't Miss