विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : आगामी रमजान ईद व गुढीपाडवा बंदोबस्त संबंधाने तालुका स्टेडियम गोरक्षण वॉर्ड येथे आज २३ मार्च रोजी राजुरा उपविभाग स्तरावर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे मॉब ड्रिल सराव सकाळी घेण्यात आले.
सदर मॉब ड्रिलमध्ये कवायत प्रशिक्षक पोहवा. दडमल पोलीस मुख्यालय चंद्रपूर यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच दंगा काबू, कवायत आदीचे प्रात्यक्षिक सादर केले. सदर मॉब ड्रिलमध्ये राजुरा उपविभागातील उपविभागीय पोलिस अधिकारी राजुरा, पोस्टे बल्लारपूर येथील ९ पोलीस अधिकारी, ४५ पोलीस अंमलदार, पो.स्टे. राजुरा येथील २ पोलीस अधिकारी, ३५ अंमलदार, उप पो.स्टे. धाबा येथील १ पोलीस अधिकारी, १० अंमलदार, पो.स्टे. कोठारी येथील १ पोलीस अधिकारी, १० अंमलदार, उप पो.स्टे. लाठी येथील १ पोलीस अधिकारी, ५ अंमलदार, पो.स्टे. विरुर येथील १ पोलीस अधिकारी, १३ अंमलदार असे एकूण १५ पोलीस अधिकारी व ११८ पोलीस अंमलदार हजर होते. यात २० – २५ महिला पोलीस अंमलदार हजर होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे, राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मॉब ड्रिल घेण्यात आले. त्यात बल्लारपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक जंगमवार, महिला पोलीस उपनिरीक्षक मीनल कापगाते, परि. पोलीस उपनिरीक्षक सौरव साळुंखे, परि. पोलीस उपनिरीक्षक सुनील धांडे, कोठारी चे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक योगेश खरसान, धाबा चे ठाणेदार राजेश गावडे, विरुर ठाणेदार वाकडे, लाठी ठाणेदार सहारे सह पोलीस अधिकारी हजर होते.
