विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : आज नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम (Financial Rule Change) बदलले आहेत. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
नवीन वर्षात यूपीआय, सिम कार्ड, आयकर परतावा यासह काही बँक अकाऊंटसंदर्भातील नियमांमध्येही बदल झाला आहे. त्यामुळे याची झळ तुमच्या खिशाला बसणार आहे. १ जानेवारी २०२४ पासून कोणते आर्थिक नियम बदलले आहेत, हे सविस्तर जाणून घ्या.
सिमकार्ड –
आजपासून नवीन दूरसंचार विधेयक लागू झाल्यामुळे मोबाईल सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल झाला आहे. १ जानेवारी २०२४ पासून, तुम्हाला नवीन सिम कार्ड खरेदी करताना बायोमेट्रिक्सद्वारे माहिती द्यावी लागणार आहे. नव्या नियमानुसार आता टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. याशिवाय सरकारने दूरसंचार कंपन्यांना डिजिटल केवायसी करणे अनिवार्य केले आहे.
निष्क्रिय UPI अकाऊंट बंद होणार –
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ जानेवारीपासून यूपीआय अकाऊंट (UPI Account) संदर्भातील नियमातही बदल झाला आहे. गेल्या एक वर्षापासून वापरात नसलेली UPI खाती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून आजपासून बंद करण्यात येणार आहे.
आयकर परतावा –
१ जानेवारी २०२४ पासून आयकर परतावा भरण्यासाठी दंड भरावा लागणार आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा ITR भरण्यासाठी करदात्यांकडे ३१ डिसेंबर हा शेवटचा दिवस होता. आयटीआर फाईन न केलेल्या करदात्यांना आजपासून आयकर परतावा भरताना दंड भरावा लागणार.
पासपोर्ट-व्हिसा नियम –
वर्ष २०२४ पासून, परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी त्यांचा अभ्यास संपण्यापूर्वी व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. म्हणजेच विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत कोणत्याही देशात वर्क व्हिसावर जाऊ शकणार नाहीत.
डिमॅट अकाऊंट –
ज्या खातेदारांनी ३१ डिसेंबरपर्यंत डिमॅट अकाऊंटला नॉमिनी जोडले नसतील, त्यांची खाती १ जानेवारी २००२४ पासून गोठवली जाऊ शकतात. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने डीमॅट खात्यात नामांकन (Nominee) जोडण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ होती.
सॉफ्ट ड्रिंक्स महागणार –
नववर्षात शीतपेये, फळांचा रस आणि प्लांट-बेस्ड दुधावर कर वाढल्याने ही उत्पादने महागली आहेत.
