– २७ मार्चला आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शासनाने ओपीएस, एनपीएस, युपीएस आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या विकल्प निवडीचा पर्याय दिला आहे.
त्याअनुषंगाने कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विकल्प देतांना कोणती योजना निवडायची यासाठी सविस्तर माहिती देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेमार्फत २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दुपारी १.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कार्यशाळा आयोजित केली आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांचे हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे, जिल्हा कोषागार अधिकारी शुभदा चिंचोळकर, मातोश्री अकाऊंट केअर कन्सल्टन्सीचे संचालक प्रकाश वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य मध्यवर्ती सहकारी संघटनेचे वर्धा जिल्हा शाखेचे अध्यक्ष दिपक धाबर्डे, कार्याध्यक्ष प्रशांत भोयर, कोषाध्यक्ष मनोज धोटे व सरचिटणीस पंकज आगलावे यांनी केले आहे.
