Latest Posts

पालांदूर : अनियंत्रित ट्रकचा तिहेरी अपघात, तीन जण गंभीर जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara): भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथील एका धक्कादायक अपघातात तीन जण गंभीरपणे जखमी झाले. अनियंत्रित ट्रकने समोरून येणाऱ्या सायकल, दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे सर्वच वाहनांचे मोठे नुकसान झाले.

घटना सोमवारी सकाळी १० वाजता पालांदूरच्या पुढे, जेवणाळा तालुक्यातील विनायक बुरडे यांच्या शेताजवळ (फार्म हाऊस) घडली. ट्रक पालांदूर येथून लाखनीकडे जात असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने आधी सायकलस्वार, नंतर दुचाकीस्वार आणि अखेर एक चारचाकी वाहनाला जबरदस्त धडक दिली.

जखमींची नावे अशी आहेत –
चंद्रभान श्रीराम गॉधोळे (६०, जेवणाळा), काजल विनोद गोटेफोडे (१५, जेवणाळा), प्रशांत बोरकर (७९, लाखनी), अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटला, आणि ट्रकचालक मंगेश तेजराम शहारे (पालांदूर) घटनास्थळावरून पळून गेला. सूत्रांनुसार, ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी चर्चा केली जात आहे.

तीनही जखमींना प्राथमिक उपचारांसाठी पालांदूर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आणि नंतर त्यांना भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले गेले. विद्यार्थिनी काजलच्या डोक्याला, वयोवृद्ध चंद्रभान यांच्या गुडघ्याला आणि कारचालक प्रशांत यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु वृत्त लिहीपर्यंत संबंधित ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.

Latest Posts

Don't Miss