– ग्रामपंचायत व नगर परिषद क्षेत्रातील २१० केंद्रासाठी प्रस्ताव आमंत्रित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय १९ जानेवारी २०१८ अन्वये राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरीकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्याकरीता प्रत्येक ग्राम पंचायतस्तरावर व नगर परिषद / नगर पंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे असल्यामुळे, गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या १९६ ग्रामपंचायत स्तरावर व १० नगर परिषद / नगर पंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र रिक्त असल्याने महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय १९ जानेवारी २०१८ च्या परिच्छेद १ (अ) व (आ) मधील निकषाप्रमाणे ग्राम पंचायतस्तरावर १९६ व नगर पंचायत स्तरावर १४ असे एकुण २१० आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाचे आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रिक्त असलेल्या १९६ ग्राम पंचायत १० नगर परिषद / नगर पंचायतची यादी व अर्जाचा नमुना, जिल्ह्याच्या वेवसाईट (www.gadchiroli.gov.in) या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच रिक्त असलेल्या ग्राम पंचायत व नगर परिषद/ नगर पंचायत स्तराची यादी व नमूना जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयाचे नोटिस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून, अर्जदारांनी १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथिल सेतू शाखेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.
