Latest Posts

खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात श्रीराम जन्मभूमी अयोध्या मंदिर प्राण प्रतिष्ठा अक्षदा वाटप 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : येत्या २२ जानेवारी ला भगवान श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्याला मुर्ती प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी भगवान श्रीरामाचे पूजन व्हावे, भजन, व कीर्तन व्हावे आणि २२ जानेवारी २०२४ ला प्रत्येकांच्या घराघरांमध्ये रांगोळी, दिवे लावून दिवाळी या सणासारखा जल्लोउत्सव साजरा करावा.

अयोध्येला दर्शनांसाठी जाण्याकरिता अयोध्या वरून आलेल्या अक्षदाचे पुजन करून देवघरांसमोर किंवा मंदिरामध्ये अर्पण करावे. यासाठी प्रत्येक घरोघरी अक्षदा वाटपाचा कार्यक्रम संपूर्ण भारतभर, विश्वभर सुरू आहे.

हा अभियान ०१ जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत असल्यामुळे गडचिरोली शहरातील परिसरात गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनू. जनजाती मोर्चाचे अशोक नेते यांच्या नेतृत्वात तसेच सोबत जिल्हा संघ चालक घिशुलांलजी काबरा, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, माजी न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, दिलीप खडसे, शहराध्यक्ष धानोरा सारंग साळवे, इत्यादींनी गडचिरोली शहरातील जुनी वस्ती, त्रिमूर्ती चौक, आणि दुर्गा मंदिर, व्यापारी लाईन, जवळच्या परिसरात घराघरांत फिरून अक्षदा वाटपाचा कार्यक्रम केला. हे अभियान पूर्ण करण्यासाठी नागरिक जनतेनी आपणही या अभियानात सहभागी होऊन अक्षदा वाटप करावे, असे आवाहन ही याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले

Latest Posts

Don't Miss