विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ५० अन्यये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना HSRP बसविण्याची तरतुद करण्यात आली आहे. या वाहनांना नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना HSRP बसविणे आवश्यक असून मा. सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश दिलेले आहेत. त्याअन्वये भंडारा जिल्ह्यातील सर्व वाहन धारकांना त्यांच्या वाहनांना HSRP बसविण्याकरिता पुढीलप्रमाणे सुचना जारी करण्यात येत आहेत.
भंडारा जिल्ह्याकरिता MA FTA HSRP SOLUTION PVT LTD ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून HSRP नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल http://maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आलेले आहे.
वाहनधारकांनी वरील पोर्टलवर बुकीग करून त्यांच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेवून HSRP नंबर प्लेट आपल्या वाहनास बसवून घ्यावी, वाहनधारक भंडारा उप प्रादेशिक पविहन कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त भंडारा. जिल्ह्यात वाहन वापरत असेल तरी देखील सदर वाहनास HSRP नंबर प्लेट वसविणे आवश्यक आहे.
सदर IISRP नंबर प्लेट बसविण्याकरीता पुढीलप्रमाणे शुल्क हे GST वगळून आकारण्यात येणार आहे.
वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविण्या संदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवापुरवठा चारकांच्या पोर्टलवर तसेच भंडारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार दाखल करू शकतात.
वाहनाचा प्रकार व शुल्क –
दुचाकी/ट्रॅक्टर रुपये 450/
तीन चाकी रुपये 500/-
इतर सर्व वाहने रुपये 745
भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना सुचित करण्यात येते की, त्यांच्या वाहनाचर HSRP नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे / उत्तरविणे / दुय्यम प्रत/ विमा अद्ययावत करणे इ. कामकाज थांबविण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.
याद्वारे HSRI नंबर प्लेट नसलेली वाहने, अनावट HSRP नंबर प्लेट असलेली वाहने इ. वाहनांवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भंडारा विभागानी कळविले आहे.
