विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : विदर्भ न्यूज एक्सप्रेसचा नववा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात प्रेस क्लब गडचिरोली येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमात अध्यक्ष अविनाश भांडेकर यांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसच्या प्रामाणिक आणि तळमळीच्या पत्रकारितेचे कौतुक केले. त्यांनी संस्थेच्या समाजातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक मनिष कासर्लावार, प्रेस क्लबचे सचिव रूपराज वाकोडे, तसेच रोहिदास राऊत, सुरेश पद्मशाली, विलास देशमुख, नंदकिशोर काथवटे, मनोज ताजने, निलेश पटले, संदीप कांबळे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
विदर्भ न्यूज एक्सप्रेसच्या या यशस्वी प्रवासामध्ये वाचक आणि पत्रकार बंधूंच्या सहकार्याने संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवव्या वर्धापन दिनानिमित्त, संस्थेने समाजासाठी अधिक कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विदर्भ न्यूज एक्सप्रेसच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी संस्थेला शुभेच्छा देत तिच्या यशस्वी वाटचालीसाठी पाठिंबा व्यक्त केला.
