विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : केंद्र व राज्य शासन, अंगिकृत उद्योग, महामंडळे, महापालिका, तसेच २५ किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या सर्व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र (ER-I) सादर करण्याचे आवाहन अ.मु. पवार, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांनी केले आहे.
कायद्यानुसार, सर्व नियोक्त्यांनी दर तिमाही अखेर (मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर) मनुष्यबळाची माहिती ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे.
विवरणपत्र सादर करण्याची प्रक्रिया :
– सदर विवरणपत्र महास्वयम वेब पोर्टलवर (https://rojgar.mahaswaym.gov.in) ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
– नियोक्त्यांनी पोर्टलच्या एम्प्लॉयर (List a Job) टॅबवर जाऊन आपले युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगइन करावे.
– ER-I रिपोर्ट पर्यायावर क्लिक करून त्रैमासिक विवरण ऑनलाईन सादर करावे.
ज्या नियोक्त्यांनी अद्याप महास्वयम पोर्टलवर नोंदणी केलेली नाही, त्यांनी तत्काळ पोर्टलवर नोंदणी करून आपल्या आस्थापनेची माहिती भरावी. अधिक माहिती किंवा तांत्रिक अडचणीसाठी mumbaicity.employment@gmail.comया ईमेलवर संपर्क साधावा. हे विवरणपत्र ऑफलाईन स्वीकारले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
