Latest Posts

सर्वसामान्यांच्या जीवाभावाचा लाडका स्वर्गीय स्वप्नील वरघंटे यांचे स्वप्न साकार : डॉ. प्रणय खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना

– चामोर्शीत स्वर्गीय स्वप्नील वरघंटे स्मृती प्रित्यर्थ प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (Chamorshi) : चामोर्शी शहरातील महिला महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात स्वर्गीय स्वप्नील वरघंटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आ. डॉ. मिलिंद नरोटे उपस्थित होते. त्यांनी फित कापून आणि चेंडू टोलवून या स्पर्धेचे उद्घाटन केले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना अशोक नेते म्हणाले, स्वप्नील माझ्यासाठी लहान भावाप्रमाणे होता. तो सदैव कोणत्याही कामासाठी तत्पर असायचा. त्याची कार्यक्षमता आणि समर्पण हनुमानासारखी होती. आजही त्याची आठवण माझ्या हृदयात जिवंत आहे. त्याच्या स्मृतीला साजेसा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आहे. स्पर्धेच्या आयोजक आणि खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिले.

यावेळी उपस्थित मान्यवर यांनी सुद्धा आपापले मनोगत व्यक्त केले डॉ. प्रणय  खुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, या भागातील सर्वांच्या जीवाभावाचा लाडका स्वर्गीय स्वप्नील याचे स्वप्न साकार होताना आज दिसत आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रणय खुणे यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे, तसेच या स्पर्धेच्या आयोजिका नगरसेविका रोशनी वरघंटे यांच्यासह भाजपाचे युवा नेते तथा ओबीसी नेते भास्कर बुरे, युवा नेते नरेश अल्सावार, निरज रामानुजवार, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उमेश अग्रवाल, वासुदेव चिचघरे, रेवनाथ कुसराम, भाविक आभारे, गजानन बारसागडे, चांदेकर, शेषराव कोहळे, संतोष भांडेकर, पोषक गेडाम मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वप्नील यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि या क्रिकेट स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. तसेच शहरातील बंधू-भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. स्पर्धेचे आयोजक आणि सहभागी खेळाडूंच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांनी संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Latest Posts

Don't Miss