विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : आजच्या डिजिटल युगात, आर्थिक व्यवहार आणि सरकारी कामांसाठी पॅन कार्ड हा महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. बँक खाते उघडणे, मोठ्या रकमेचे व्यवहार करणे, शेअर्स खरेदी आणि आयकर भरणे यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
पॅन कार्ड २.० चे नवीन वैशिष्ट्ये –
१) कार्डधारकाची संपूर्ण माहिती एन्क्रिप्टेड स्वरूपात साठवली जाईल, ज्यामुळे बनावट कार्ड ओळखणे सोपे होईल.
२) अर्जदाराचे फिंगरप्रिंट व बुबुळ स्कॅन जोडले जातील, त्यामुळे ओळख अधिक सुरक्षित होईल.
३) बनावट पॅन कार्ड रोखण्यासाठी पॅन-आधार लिंकिंग बंधनकारक करण्यात आले आहे.
४) अर्ज प्रक्रिया डिजिटल झाली असून, फक्त ३ दिवसांत नवीन पॅन कार्ड मिळू शकते.
पॅन कार्ड २.० चे फायदे –
फसवणूक आणि करचोरी रोखण्यास मदत.
वेळ आणि कागदपत्रांची बचत.
डुप्लिकेट पॅन कार्ड बंद, त्यामुळे सरकारला अधिक महसूल.
ऑनलाइन अर्ज केल्यास कार्ड लवकर मिळते.
जुने पॅन कार्ड वैध राहणार का?
होय सध्या जुने पॅन कार्ड वैध राहणार आहेत. मात्र भविष्यात पॅन कार्ड २.० ला अनिवार्य केले जाण्याची शक्यता आहे.
अर्ज कसा करावा?
१) http://www.incometaxindiaefiling.gov.in वर भेट द्या.
२) Apply for PAN पर्याय निवडा.
३) माहिती भरा व आधार क्रमांक द्या.
४) शुल्क भरा आणि पावती जतन करा.
५) ३-७ दिवसांत नवीन पॅन कार्ड प्राप्त करा.
पॅन कार्ड २.० हे आर्थिक व्यवहारांना अधिक सुरक्षित व पारदर्शक बनवेल. बनावट पॅन कार्ड रोखण्यास, करचोरी कमी करण्यास आणि डिजिटल व्यवहार सुलभ करण्यास मदत होईल. प्रत्येकाने आपले पॅन कार्ड अपडेट ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत.
