Latest Posts

नागपूर शहर परिवहन कार्यालयाकडून वाहनांचा जाहीर लिलाव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर यांनी मुंबई मोटार वाहन कर कायद्यांतर्गत थकीत कराच्या वसुलीसाठी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

शहर परिवहन कार्यालयामार्फत जप्त / अटकावून ठेवलेल्या वाहनांची विक्री ई लिलावाद्वारे करण्यात येत आहे.

लिलावामध्ये विक्री करावयाच्या वाहनांची यादी, लिलावाचा दिनांक, ठिकाण तसेच अटी व शर्ती इत्यादी माहिती महाराष्ट्र शासनाच्या e.auction.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लिलावाबाबतची माहिती व वेळापत्रक ई- लिलाव पोर्टल e.auction.gov.in वर उपलब्ध आहे.

शुक्रवार १३ मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहर येथे हा लिलाव होणार असल्याचे कराधान प्राधिकारी तथा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss