विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : माझी वसुंधरा अभियान ४.० तथा स्वच्छता पंधरवडा उपक्रमा अतंर्गत नगर परिषद गडचिरोली व्दारा दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सामाजिक उपक्रमासह पर्यावरण पुरक गणेशोत्सव शहरात साजरा करण्यात येणार आहे.
विविध सामाजिक उपक्रमा अंतर्गत रक्तदान शिबिर, आभा हेल्थ कार्ड योजना, पि.एम. स्वनिधि योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान संदर्भात माहीती, दिव्यांग नांव नोंदणी इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार असुन पर्यावरणपुरक गणेशोत्सवा अतंर्गत सर्व सार्वजनिक मंडळाची गणेश मुर्ती शाहूच्या किंवा मातीच्या वापराव्या, मंडळाचा परिसर स्वच्छ ठेवावा, निर्माल्यासाठी कापडी पिशवी किंवा निर्माल्य कलशाचा वापर करावा, सजावटी साठी कागदी मखराचा वापर करावा, प्लास्टीक किंवा थर्माकोल चा वापर टाळावा, मंडपाची जागा रहदारीस अडथळा न होता कमीत कमी जागा व्यापक असावी, ध्वनिप्रदुषन टाळावे, पर्यावरण संर्वधनाची चालना देणारे देखावे असावे, मंडळ परिसरात तथा विसर्जनाचे दिवशी शांतता व सलोख ठेवावा.
अशा सर्व निकषाचे पालन करणाऱ्या गणेश मंडळाचे नगर परिषदेच्या तपासणी चमू मार्फत सर्वेक्षण करून सर्वोत्कृष्ठ तीन सार्वजनिक गणेश मंडळाना प्रथम पारीतोषिक रु. २५ हजार, व्दितिय पारीतोषिक रु. १५ हजार, तृतिय पारीतोषिक रु. १० हजार रोख स्वरुपात नगर परिषद, गडचिरोली मार्फत प्रदान करण्यात येईल.
घरगुती गणेश मूर्ती विर्सजन करण्याकरिता नगर परिषद तर्फे कृत्रीम तलाव उपलब्ध करुन दिले जाईल. तसेच नमुद पर्यावरण पुरक निकष पाळणाऱ्या घरगुती मुर्तीना नगर परिषद तर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल, असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली यांनी केले आहे.
