Latest Posts

मोबाईल ऑन ई- व्हेईकल योजनेकरिता दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : सन २०२४-२५ करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावरुन सुरु आहे. तसेच या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन गरजू दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज करण्यासाठी) पोर्टल https://register.mshfdc.co.in ही लिंक १० फेब्रुवारी, २०२५ दुपारी १२.०० वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ जास्ती जास्त  दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या भंडारा विभागानी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss