Latest Posts

लाखो प्रवाशांना बसणार फटका : गडचिरोली- नागपूरला जाण्याकरिता मोजावे लागणार २९२ रुपये 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) २५ जानेवारीपासून १४.९५ टक्के भाडेवाढ जाहीर केली. त्यामुळे जनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास महागला आहे. याचा फटका जिल्ह्यातील लाखो प्रवाशांना बसणार आहे. पूर्वी नागपूरसाठी २५५ रुपये तिकीट होते, आता २९२ रुपये मोजावे लागणार आहेत.

एसटी महामंडळाने लागू केलेली भाडेवाढ लागू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर याचा भार पडणार आहे. एकीकडे एसटी महामंडळाने सवलतींचा वर्षाव केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना अर्धे तिकीट अशा परिस्थितीत भाडेवाढीचा सामान्य प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मागील तीन वर्षांपासून एसटीच्या तिकीट वाढ झाली नव्हती. त्यामुळे एसटीचे चाक तोट्यात रुतले होते. यातून बाहेर काढण्यासाठी भाववाढ आवश्यक होती, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. तिकीट दरात वाढ करतानाच चांगली सेवाही द्यावी लागणार आहे. प्रवाशांकडून चांगल्या सुविधांची अपेक्षा राहील.

ठिकाणनिहाय तिकीट –
ठिकाण                       पूर्वीचे     नवीन 
गडचिरोली- नागपूर          २५५       २९२
गडचिरोली- चंद्रपूर           १२५       १४२
गडचिरोली- चामोर्शी         ५५         ६१
गडचिरोली- अहेरी            १७५       २०२
गडचिरोली- देसाईगंज        ८०         ९०
गडचिरोली- सावली           ४५         ५१
गडचिरोली- मूल              ६०         ७१
गडचिरोली- धानोरा           ५५         ६१

Latest Posts

Don't Miss