Latest Posts

महाराष्ट्र संघ राष्ट्रीय वूडबॉल स्पर्धेत दोन्ही गटांत ठरला विजेता

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / नागपूर : महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर आयोजित १३ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर वूडबॉल स्पर्धेत वर्चस्व गाजवित जेतेपदाचा मान मिळविला. वूडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र वूडबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २५ राज्यातील ५५० खेळाडूंचा सहभाग होता.

स्ट्रोक सांघिक प्रकारात महाराष्ट्र संघ दोन्ही गटांत विजेता ठरला. फेअर वे प्रकारात मुलांच्या गटात महाराष्ट्र तसेच मुलींच्या गटात गुजरातने बाजी मारली. स्पर्धेचे पुरस्कार वितरण काटोलच्या माधुरीताई देशमुख नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. रेखा राणीसिंग, उपप्राचार्य डॉ. सुषमा मानवटकर, प्राची बागडे, सुप्रिया मसराम, जयश्री आगलावे आणि काजल रॉबिनसिंग कांडा आदींच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या संघांना आणि खेळाडूंना आकर्षक करंडक तसेच सुवर्ण रौप्य तसेच कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले.

Latest Posts

Don't Miss