Latest Posts

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ राखीव निकालाच्या सुनावणी

– उमेदवारांनी म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : १० नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील ७८६ उमेदवारांचा निकाल काही कारणास्तव राखीव ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणी सुनावणीकरीता संबंधित उमेदवारांना २५ मार्च ते ४ एप्रिल २०२५ पर्यंत सकाळी ११ वाजता उमेदवार निहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे आपले म्हणणे मांडण्याकरीता प्रस्तुत कार्यालयात उपस्थित राहणेबाबतचे पत्र संबंधित उमेदवारांच्या ई-मेल, एस.एम.एस. व परीक्षार्थ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तरी कळविण्यात आलेल्या दिवशी सकाळी ११:०० वाजता स्वखर्चाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे. सदर दिवशी आपण समक्ष हजर राहीला नाहीत तर आपणास सदर प्रकरणी काही सांगावयाचे नाही असे गृहीत धरून त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय आपणावर बंधनकारक राहील, याची नोंद घेण्याचे कळविण्यात आले आहे.

सुनावणीच्या वेळी आपले आधारकार्ड, शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ मधील उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी, परीक्षेचे प्रवेशपत्र, पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक असलेले अनुषंगीक सर्व कागदपत्रे, संदर्भात गुणपत्रक प्रमाणपत्र तसेच फोटो ओळखपत्र (चालक परवाना / बैंक पासबुक / निवडणूक ओळखपत्र / पासपोर्ट यापैकी कोणतेही एक) यासह स्वतः उपस्थित राहावे. सुनावणीच्या वेळी आपल्या वतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss