Latest Posts

हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधुन काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

– सायबर पोलीस ठाणे गडचिरोली कडुन शोध घेतलेल्या ५३ मोबाईलचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : ०२ जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असुन ०२ ते ०८ जानेवारी पर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केलो जातो. या कालावधील पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जातात. या निमित्याने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात सायबर अवेयरनेस रॅली तसेच विविध उपक्रम सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजन करण्यात येत आहेत. रेझींग डे सप्ताह निमित्त चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईल वाटप कार्यक्रम पार पाडण्यात आला.

तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असून मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनच्या मार्फतीने गडचिरोली पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे नोंदविली जाते. सदरबाबत सायबर पोलीस स्टेशनमार्फत चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो.

मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलद्वारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवला किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. या बाबींचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशन मार्फत तांत्रीक कौशल्याचा वापर करुन हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो. मागील वर्षी सन २०२४ मध्ये एकुण ११९ मोबाईलचा शोध घेण्यात आला असुन त्यांची अंदाजे किमत एकुण १९ लाख ३१ हजार ९१२ रुपये एवढी होती. तसेच माहे सप्टेंबर २०२४ ते डिसेंबर २०२४ या चार महिन्याच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या ५३ मोबाईलचा शोध घेवुन आज ०७ जानेवारी २०२५ रोजी सर्व मोबाईल संबंधित तक्रारदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय (मिटींग हॉल) येथे बोलावुन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे हस्ते सुपुर्द करण्यात आले आहे. त्यांची अंदाजे किंमत एकुण ८ लाख ५५ हजार ५६१ रुपये आहे.

यावेळी चोलतांना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जनतेला आवाहन केले की, सच्या सायबर गुन्याचे प्रमाण वाढत असुन, सायबर गुन्हेगारांमार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक केली जाते. यासोबतच डिजीटल अरेस्टद्वारे व आर्टीफिशीयल इंटीलेजन्स (AI) च्या सहाय्याने कोणाच्याही संवेदनशिल फोटोना एडीट करुन लोकांची फसवूणक केली जाते, त्यामुळे जनतेने सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे. आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर १९३० या नंबरवर तक्रार नोंदवावी व मोबाईल चोरी झाला असेल तर तात्काळ ceir.gov.in या पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी. तसेच मोबाईल कुठे हरवल्यास किंवा चोरी इझाल्यास न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेवुन तात्काळ जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें तसेच मायबर पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश व अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्रेणिक लोढा यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोस्टे येथील प्रभारी अधिकारी पोनि. अरुण फेगडे, मपोउपनि नेहा हांडे व मपोहवा/६३८ वर्षा बहिरवार, मनापोअं/२९१८ सगनी दुर्गे, पोअं/२४३१ संजिव लेंडगुरे, पोअं/२५३८ दिवाकर तनमनवार यांनी पार पाडली.

Latest Posts

Don't Miss