विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी जात आहेत.
आपात्कालीन स्थितीत प्रयागराज येथील कंट्रोल रुम दुरध्वनी क्रमांक ०५२२ – २२३७५१५ आहे. तसेच मंत्रालय नियंत्रण कक्ष मुंबई क्रमांक ०२२-२२०२७९९० तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर (०७१२) – २५६२६६८ हा आहे.
प्रयागराज येथे दर्शनासाठी गेलेल्या नागरिकांनी आवश्यकतेनुसार अडचण आल्यास या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
