विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील चिंतलपेठ येथे आज ७ जानेवारी रोजी रविवारला सकाळच्या सुमारास कापसाच्या शेतात काम करत असतांना वाघाच्या हल्यात मृतक सुषमा देवदास मंडल जागीच ठार झाली.
माहितीनुसार, सदर महिला मुलचेरा तालुक्यातील मथुरानगर येथील रहिवासी असून मागील ३० ते ३५ वर्षीपासून अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे स्थायी झाली. घरी एक किराणा दुकान असून चिंतलपेठ गावात शेती आहे. सुषमा देवदास मंडल आज सकाळी शेतात कापूस वेचणी करीत असतांना अचानक वाघाने झडप घेऊन हल्ला केला. त्यात महिला जागीच ठार झाली. त्यामुळे मंडल परिवारावार दुःखाचे डोंगर कोसळले आहे. ही माहिती स्थानिक आविसं- काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आविसं- काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना मिळताच घटनास्थळी धाव घेतले.
घटनास्थळी असलेले नागरिक आणि त्यांचे नातेवाईकांनी १० मिनिटासमोर वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पोस्टमार्टम साठी हलवण्यात आली, अशी माहिती माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना मिळताच लगेच अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन मंडल परिवाराचा नातेवाईकांना भेट घेतले. फॉरेस्ट विभागाचे अधिकारी उपवनक्षक यांनी ब्रह्मणद्वणी द्वारे नरभक्षक वाघाला त्वरित जरबंद करण्याची विनंती केली.
यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक आलापल्ली हनमंतू मडावी, अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर, स्वप्नील मडावी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, प्रशांत गोड्सेलवार नगरपंचायत नगर सेवक, स्वप्नील मडावी, प्रमोद गोडसेलवार, सचिन सह आदीची उपस्थिती होती.
