विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (bhandara) : जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ललित गांधी हे २७ मार्च २०२५ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध महत्त्वाच्या बैठका आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
ललित गांधी सकाळी ७.०० वाजता नागपूर विमानतळ येथून शासकीय वाहनाने भंडाराच्या दिशेने प्रयाण करतील. सकाळी ८.३० वाजता ते भंडारा येथे आगमन करून शासकीय विश्रामगृहात पोहोचतील. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ते भंडारा येथील जैन मंदिरात दर्शनासाठी जातील.
सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात येईल. सकाळी ११.३० वाजता भगवान महावीर निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल. यावेळी सकल जैन समाज व व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा केली जाईल. हा कार्यक्रम नियोजन भवन, भंडारा येथे होणार आहे.
दुपारी १२.०० वाजता व्यापारी, उद्योजक व संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी १.३० वाजता जैन अल्पसंख्याकआर्थिक विकास महामंडळाच्या भंडारा जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन ख्रिस्ती महाल वार्ड, उर्दू शाळेसमोर, ख्रिस्तीवाडा, भंडारा येथे करण्यात येईल.
