Latest Posts

जय पेरसापेन क्रीडा मंडळ पेरमिली ग्रामीण कबड्डी सामने व ३० यार्ड क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण संपन्न

– माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या सहकार्याने आयोजित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील पेरमिली येथे जय पेरसापेन क्रीडा मंडळ वतीने २ जानेवारी २०२४ पासून ते ७ जानेवारी २०२४ पर्यंत ग्रामीण कबड्डी सामने व ३० यार्ड क्रिकेट सामने घेण्यात आले. ग्रामीण कबड्डी सामने व क्रिकेट सामने या दोन्ही सामन्याकरिता प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ३० हजार बक्षीस व द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला २० हजार बक्षीस, अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्याकडून देण्यात आले. तर तृतीय क्रमांक विजेत्या संघाला १० हजार बक्षीस, युवा नेते अवधेषरावबाबा आत्राम यांचेकडून देण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी ग्रामीण कबड्डी सामने व ३० यार्ड क्रिकेट सामन्याला स्पर्धेला हजरी लावली होती. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशांत ढोंगे माजी पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते विजयी संघांना बक्षीस वितरित करण्यात आले.

त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संदीप गावडे, संजय सडमेक, विट्टल मेश्राम, रघुनाथ मेश्राम, अविनाश मेश्राम, वासुदेव कोडापे, सुनील कांबळे, यशवंत मडावी, शंकर गावडे, संपत गावडे, देवराव मडावी हे होते.

यावेळी मोठ्या उत्साहात क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी पेरमिली येथील गावकरी, युवा वर्ग आणि महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss