Latest Posts

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : बल्लारपूर शहरातील गोकुळ नगर वार्डात राहणारे ज्ञानेश्वर पांडुरंग झाडे (४२) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज २७ जानेवारी ला दुपारी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळनगर वॉर्ड श्रमिक भवनाच्या मागे राहणारा ज्ञानेश्वर हा दारूचे व्यसन करत होता.

आज दुपारी त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला.  याप्रकरणी बल्लारपूर पोलीस तपास करत आहेत.

Latest Posts

Don't Miss