Latest Posts

व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन : राष्ट्रीकृत, खाजगी व सहकारी बँकेतून व्यवसायी कर्ज उपलब्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने मराठा प्रवर्गासाठी  वैयक्तिक व गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीयकृत, खाजगी व सहकारी बँकेतून व्यवसायी कर्ज उपलब्ध आहे.  या योजनांचा मराठा प्रवर्गातील उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा समन्वयक सागर आंबेकर यांनी केले आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना –

या योजनेत लाभार्थ्याने बँकेमार्फत घेतलेल्या १५ लाखापर्यंतच्या कर्जाचा १२ टक्के व्याज दराने ४.५ लाख रुपयांच्या मर्यादेत व्याजाची रक्कम लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. हा कालावधी ७ वर्षाचा असेल.

गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना –

या योजनेत गटास जास्तीत जास्त ५० लाख रुपयापर्यंतच्या बँकेमार्फत देण्यात आलेल्या उद्योग उभारणी कर्जावर जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराने १५ लाख रुपयांच्या मर्यादेत व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. हा कालावधी ५ वर्षाचा असेल. लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेची अट स्त्री-पुरुषांसाठी कमाल ६० वर्ष असेल. लाभार्थींचे कौटूंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांच्या आत असावे.

पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे –

आधार कार्ड (अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वतःच्या ई-मेल आयडी सह), रहिवासी पुरावा (रहिवासी दाखला/ वीज देयक/रेशनकार्ड/गॅस बिल/बैंक पास बुक / भाडे करारनामा/लँडलाइन टेलिफोन बिल/पासपोर्ट) सोबत जोडावा. उत्पन्नाचा पुरावा (उत्पन्नाचा दाखला/आयटी रिटर्न (जर लग्न झालेले असल्यास पती-पत्नीचे व लग्न झाले नसल्यास स्वतःचे आयटी रिटर्न अनिवार्य) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, एक पानी प्रकल्प अहवाल सोबत जोडावा. स्वयं-साक्षांकीत घोषणापत्र नमुना udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Latest Posts

Don't Miss